बीड-चंदनाची चोरटी वाहतूक करणारा एक टेम्पो आज सकाळी ६ च्या सुमारास नेहरकर पेट्रोल पंप केज-धारूर रोडवर स्थानिक गुन्हे शाखा व केज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या कारवाईत लाखो रुपयांचे चंदन जप्त करण्यात आले असून दोन आरोपी केज पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलीस निरीक्षक श्री महाजन,सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर स्वतः केज पोलीस ठाण्याला दाखल झाले आहेत.
बीड जिल्ह्यात चंदनाची तस्करी मोठया प्रमाणावर सुरु असते. आज सकाळी एका टेम्पोमधून चंदनाची वाहतूक सुरु असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती.केज-धारूर रोडवर असणाऱ्या नेहरकर पेट्रोल पंपावर एका टेम्पोमध्ये चंदनाचा मोठा साठा होता. यावेळी पोलिसांनी सदर टेम्पोची झाडाझडती घेतली असता यात चंदन फर्निचरच्या साहाय्याने लपून ठेवलेल्या अवस्थेतत आढळून आले.यावेळी टेम्पोतील चालक, वाहकांना केज पोलिसांनी ताब्यात घेतले असून हा टेम्पो केज ठाण्यात लावण्यात आला आहे.दरम्यान हे चंदन कोणाचे होते? हे कुठून आले याचा तपास पोलिसांच्या वतीने करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा