अंबाजोगाई-तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पुस शिवारात एका पत्रच्या शेडमध्ये गुटखा साठवून ठेवल्याची माहिती स्थानीक गुन्हे शाखेला झाल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकून ६१ हजार ५०० रुपयांचा गुटखा जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पुस शिवारातील एका शेतामध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या गुटखा साठवून ठेवल्याची माहिती स्थानीक गुन्हे शाखेला झाल्यनांतर पोलीस निगरीक्षक संतोष साबळे यांनी पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे व त्यांच्या पथकाला घटनास्तळी धाड टाकण्याचे निर्देश दिले. त्यानुसार काल त्या ठिकाणी छापा टाकून ६१ हजार ५०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. यामध्ये सुभाष रामा सातलवाड (रा. मेडका ता. मुखेड जि. नांदेड ह.मु. पुस ता. अंबाजोगाई) याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पोलीस हवालदार विकास राठोड यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचीन पांडकर, चेतन तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष साबळे, सिद्धेश्वर मुरकुटे, तुळशीराम जगताप, पी.टी. चव्हाण, विकास राठोड, राहुल शिंदे, बाळू सानप, नामदेव उगले यांनी केली आहे.