Advertisement

शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीला फटका

प्रजापत्र | Thursday, 11/04/2024
बातमी शेअर करा

पुणे- आळंदी विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते अतुल देशमुख यांनी भाजपला रामराम केला आहे. अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. देशमुख यांनी भाजपला रामराम केल्याने शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीला हा फटका मानला जात आहे. अतुल देशमुख यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. ते सध्या अजित पवारांसोबत असलेल्या खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते यांच्याकडून थोड्या मतांनी पराभूत झाले होते. मात्र, दिलीप मोहिते अजित पवारांसोबत महायुतीत सहभागी झाल्याने अतुल देशमुख नाराज झाले होते. 

 

 

भाजप सोडताच काय म्हणाले?
अतुल देशमुख राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर म्हणाले की, मागील अडीच वर्षात स्वाभिमानाला ठेच लागली. समन्वयही साधता आला नाही. मागील एक दीड वर्षात हीन वागणूक मिळाल्याने थांबण्याचा निर्णय घेतला आहे. काय करायचं हा निर्णय घ्या असं सांगितलं, स्वाभिमानाने लढायचं, पवारांमागे उभ राहायचं. आज आम्ही पवार साहेबांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश करायचं ठरवलं आहे. 

Advertisement

Advertisement