Advertisement

नाशिक-दिंडोरी मार्गावर बोलेरो-दुचाकीचा भीषण अपघात

प्रजापत्र | Friday, 05/04/2024
बातमी शेअर करा

  नाशिक- गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये अपघातांच्या घटनेत वाढ होत आहे.  आता नाशिक - दिंडोरी मार्गावर ढकांबे गावाजवळ बोलेरो गाडी आणि दुचाकीची जोरदार धडक झाली असून अपघातात पाच जण ठार झाले आहेत. तर काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 

 

 

 

टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी दिंडोरी पोलीस दाखल झाले आहेत. मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. 

Advertisement

Advertisement