Advertisement

भाजपाच्या तालावर शिंदे गट नाचतोय

प्रजापत्र | Thursday, 04/04/2024
बातमी शेअर करा

शिंदे गटातील अनेक मतदारसंघ भाजपने स्वत:कडे खेचल्याने नाराजी असल्याची चर्चा आहे. सर्व्हेचे कारण पुढे करत जागा स्वत:कडे घेतल्याची शिंदे गटातून तक्रारी आल्या होत्या. काही मतदारसंघ भाजपकडे गेल्याने शिंदे गटात नाराजीचे वातावरण आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर शिंदे यांचा पक्ष काही महिन्यांचाच सोबती आहे. विधानसभेपर्यंत हा पक्ष राहणार नाही. भाजपाच्या तालावरच शिंदे गटाला नाचावे लागते, अशी टीका ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

 

 

लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसावर आलेल्या असताना महायुतीमधील जागा वाटप तिढा, धुसफूस पूर्णपणे थांबलेली नाही. लोकसभेच्या जागा वाटपावरुन आता शिंदेंच्या शिवसेनेतच भाजप संदर्भात नाराजी सुरु झाली आहे, असा दावा अंबादास दानवे यांनी केला. भावना गवळी यांचा पत्ता कट झाला आणि हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. भाजपाने शिंदे गट आणि अजित पवार गटाला ताटाखालचे मांजर करून ठेवले आहे, या शब्दांत दानवे यांनी हल्लाबोल केला.

Advertisement

Advertisement