Advertisement

नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वैध

प्रजापत्र | Thursday, 04/04/2024
बातमी शेअर करा

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल अखेर समोर आला आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर निकाल देताना नवणीत राणा यांना दिलासा देत हायकोर्टाचा निर्णय रद्द केला आहे.नवनीत राणा यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जात आहे. अशातच त्यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे.

 

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाने २०२१ मधे अवैध ठरवलं होत. त्यानंतर या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निकालाला स्थगिती दिली होती. तसेच बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोनही गटाचा युक्तीवाद २८ फेब्रुवारीला पूर्ण झाला होता. या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निकाल दिला आहे.सुप्रीम कोर्टाने आजच्या निकालामध्ये नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे. न्यायमूर्ती जे के महेश्वरी आणि संजय करोल यांच्या पिठाने हा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे नवनीत राणा यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Advertisement

Advertisement