Advertisement

बीडमध्ये तरुणीचा विनयभंग

प्रजापत्र | Sunday, 17/03/2024
बातमी शेअर करा

 बीड -शहरातील पेठ बीड भागात एका तरुणीचा आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजच्या गेट समोर हात धरून विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

 शहरातील आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजच्या गेट समोर तेलगाव नाका परिसरात एका २३ वर्षीय तरुणीचा बबलू उर्फ राहुल शिवाजी डोंगरे रा. प्रकाश आंबेडकर नगर, इस्लामपूर रोड, पेठ बीड या तरुणाने हात धरून तू माझ्यासोबत लग्न का करत नाहीस, तू मला फार आवडतेस असे म्हणून वाईट हेतूने तरुणीचा हात धरला व शिवीगाळ करून लाथा बुक्क्‌याने मारहाण करून तू जर पोलिसात तक्रार दिली तर तुम्हा सर्वांना जीवे मारून टाकीन अशी धमकी ही दिली म्हणून पीडित तरुणीने पेठ बीड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास  पेठ बीड पोलीस करत आहेत. 

Advertisement

Advertisement