Advertisement

निलेश लंके करणार आज शरद पवार गटात प्रवेश?

प्रजापत्र | Monday, 11/03/2024
बातमी शेअर करा

मुंबई- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गटात सामिल झालेले निलेश लंके आता पुन्हा घरवापसी करत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तूळात रंगल्या आहेत. 

विशेष म्हणजे निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत आज शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलल्या जात आहे. पुण्यातील कार्यालयात हा सोहळा होणार असून शरद पवारांकडून निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनीही निलेश लंकेंना आपल्यासोबत येण्याचे आवाहन केले होते. आता निलेश लंके आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत का ? याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 

Advertisement

Advertisement