Advertisement

महिलेच्या हातातील पर्स पळविली

प्रजापत्र | Friday, 08/03/2024
बातमी शेअर करा

बीड- शहरातील साठे चौक परिसरात एका महिलेची पर्स घेऊन दोघांनी पळ काढल्याची घटना गुरुवारी (दि.७) रात्री १२:३०च्या सुमारास घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 
गुरुवारी (दि.७) रात्री १२:३० सुमारास साठे चौकातील बन्सी पावभाजी दुकाना समोरून मंगल उद्धव सुपेकर आणि सुनंदा लक्ष्मण देवकर या दोघीजणी हॉटेल क्रिस्टल येथून कामावरून घरी सम्राट चौकाकडे जात असताना बन्सी पावभाजी दुकानच्या समोर रोडवर असताना त्यांच्या हातातील पर्स ज्यामध्ये 1600 रुपये ठेवलेले होते ते हातातून हिसकावून चोरून नेले. या पर्समध्ये 500 रुपयांच्या 3 नोटा तर 100 रुपयाची एक नोट असे एकूण 1600 रुपये होते. याप्रकरणी आरोपी दानिश लतिफुद्दीन काझी रा.बळीराज गल्ली, धोंडीपुरा, बीड, (वय-17), सोहम शहाजी फाटक (वय-19) रा.घोसापुरी या दोन तरुणांवर शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बळे करीत आहेत. 

Advertisement

Advertisement