Advertisement

ओबीसी समाजाचा कीर्तनवाडीत रास्ता रोको

प्रजापत्र | Tuesday, 20/02/2024
बातमी शेअर करा

 बीड- ओबीसी आरक्षण अबाधित ठेवण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी भगवानगडाच्या पायथ्याशी गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषण करण्यात येत आहे. आज ओबीसी कार्यकर्त्यांनी कीर्तनवाडी हायवेवर चार तास रास्ता रोको आंदोलन करून टायर जाळत शासनाचा निषेध केला. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

 

 

  ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या कीर्तनवाडीत गेल्या सात दिवसांपासून ओबीसी बांधवांचे आमरण उपोषण सुरू आहे. आज आंदोलनकर्त्यांनी विशाखापट्टणम हायवेवरील कीर्तनवाडी जवळ रास्ता रोको आंदोलन केले. जवळपास चार तास रास्ता रोको आंदोलन सुरू होते. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनकर्त्यांनी टायर जाळून शासनाचा निषेध केला.

Advertisement

Advertisement