Advertisement

गूढ आवाजाने बीड हादरले

प्रजापत्र | Tuesday, 06/02/2024
बातमी शेअर करा

बीड- शहरातील अनेक भागात मंगळवारी (दि.६) रात्री ८ वाजून २० मिनिटांनी गूढ आवाज झाला. अचानक आलेल्या आवाजामुळे नागरिक व लहान बालके भयभीत झाली. हा आवाज कशाचा होता, हे समजू शकले नाही.

   

 

जिल्ह्यात यापूर्वी अनेकवेळा गूढ आवाज झाले आहेत.  दरम्यान, बीड शहरात मंगळवारी रात्री ८ वाजून २० मिनिटांनी मोठा आवाज झाला. त्यामुळे खिडक्या, घराचे दरवाजे हादरली व भांडी पडली.अनेकांना भूकंप असल्याचे जाणवले.या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.

Advertisement

Advertisement