Advertisement

धारुरामध्ये कापूस जिनींग पेटली

प्रजापत्र | Thursday, 31/12/2020
बातमी शेअर करा

सय्यद शाकेरअली 
किल्लेधारूर-येथील अंबाजोगाई रस्त्यावर असलेल्या आवरगाव शिवारातील बालाजी जिनिंगमध्ये कापसाला गुरुवारी (दि.३१) १२ च्या सुमारास भयंकर आग  लागली आहे. सध्या शासकीय कापुस खरेदी सुरु असून या आगीत मोठ्या प्रमाणावर कापुस  जळून भस्मसात झाल्याचा अंदाज आहे. सध्या धारुर नगर परिषद, लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखाना व केज नगर परिषद येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले असून आग आटोक्यात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे.

 

आगीमध्ये परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.

 

 हेही वाचा 

६ तालुक्यात आज ३६ पॉजिटीव्ह

Advertisement

Advertisement