Advertisement

कपाशीच्या शेतात पकडला विस किलो गांजा  

प्रजापत्र | Wednesday, 24/01/2024
बातमी शेअर करा

 गेवराई- काजळा परिसरात अवैध कपाशीच्या शेतात गांजाची लागवड केली असल्याची माहिती चकलांबा पोलिसांना मिळाली तसेच सदर ठिकाणी सहानिशा करूण याठिकाणी पोलिसांनी छापा मारला असता अंदाजे विस किलो गांजा या कार्यवाईत पकडला असल्याची माहिती आहे तसेच दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

 सविस्तर माहिती अशी,की गट क्रं ६८ मध्ये कपाशी च्या शेतात गांच्याची लागवड करण्यात आली असल्याची गोपनिय माहिती चकलांबा पोलिसांना मिळाली तसेच सदर घटनेची माहिती पोलिस अधिक्षक नंदकूमार ठाकूर व उपविभागिय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू यांना देऊन सदर ठिकाणी चकलांबा पोलिसांनी आज ( दि २४ रोजी ) दूपारी दोनच्या सुमारास छापा मारला व सदर ठिकाणावरून विस किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आले असुन आरोपी जमिन मालक नारायण श्रिमंत डोगरे ( वय ४८ वर्ष ) रा. काजळा याला ताब्यात घेण्यात आले असुन सदरची कार्यवाई पोलिस अधिक्षक नंदकूमार ठाकूर,अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर,उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू,यांच्या मार्गदर्शनाखाली महसुल समवेत चकलांबा ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी केली आहे.
 

Advertisement

Advertisement