Advertisement

माजलगावमध्ये आणखी एका पतसंस्थेचे दिवाळ !

प्रजापत्र | Wednesday, 24/01/2024
बातमी शेअर करा

माजलगाव-  ज्यादा व्याजाचे आमिष दाखवत ठेवीदारांना आपल्या संस्थेत रक्कम ठेव स्वरूपात ठेवायला लावून सुमारे ५७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दि.मराठवाडा अर्बन को अप क्रेडिट सोसायटीवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात संचालक मंडळावर दाखल करण्यात आला असून परिवर्तन नंतर मराठवाडा चा नंबर लागल्याने अनेक ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत.
         

 

 

   मराठवाडा अर्बन मध्ये ठेवीदारांना ज्यादाचे व्याजदर देऊ असे म्हणत ठेवीदारास व्याजाची भुरळ पाडत सदरील शाखेत ठेवी घेण्यात आल्या,सदरील ठेवीदारांचे ठेव आणि विहित मुदत पार पडून देखील देवीदाराचे पैसे न दिल्याने श्रीराम मॅचिंद्र बहिर यांच्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे दि. मराठवाडा अर्बन चे चेअरमन सतीश गंगाधर सावंत,मुख्यकार्यकारी अधिकारी गजानन विठलराव डासाळकर,संचालक मंडळावरील सदस्य वित्तसंस्थेशी संबंधित अधिकारी,कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहिर आणि त्यांच्या कुटुंबियांची सुमारे ५७ लाख रुपयांची ठेव येणे असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.संबंधितांवर कलम ४२०,४०९,४६७,४६८,३८,महाराष्ट्र ठेवीदारांचे संरक्षण अधिनियम १९९९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर प्रमुख आरोपी म्हणून चेअरमन सतीश सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Advertisement

Advertisement