Advertisement

कु.तेजस्विनी बडे हिची जिल्हा स्तरीय इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

प्रजापत्र | Friday, 25/12/2020
बातमी शेअर करा

बीड: केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत इन्स्पायर अॅवॉर्डसाठी यावर्षी बीड जिल्ह्यातील 46 उपकरणांची निवड झाली असून, त्यात धारुर तालुक्यातील जि.प.प्रा.गावंदरा शाळेची विद्यार्थ्यांनी कु.तेजस्विनी ज्ञानोबा बडे हिची जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. 

 केंद्र सरकारच्या या उपक्रमांत निवडपात्र विद्यार्थ्यांना १०,००० रुपये विज्ञान उपकरण बनवण्यासाठी दिले जातात.विज्ञान आधारित मॉडेल जिल्हास्तरावर सादर केल्यानंतर त्यातील उत्कृष्ट उपक्रमाची राज्यस्तर, केंद्रस्तर अशा क्रमाने निवड केली जाते.जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गावंदरा येथिल प्रयोग सलग तिन वर्षे राज्य पातळीवर गेला आहे मात्र या वर्षी नक्किच देशपातळीवर जाऊ असा विश्वास मुख्याध्यापक दत्ता घोळवे व मार्गदर्शक शिक्षक सचिन क्षिरसागर यांनी व्यक्त केला व शाळेचे मुख्याध्यापक दत्ता घोळवे क्षिरसागर,मुंडे,सिताप,चौधरी,

कदम,हळगावकर मॅडम,मुंडे मॅडम,मोतेवार मॅडम,गुट्टे मॅडम यांनी केले व विद्यार्थिनी कु.तेजस्विनी बडे हिच्या या यशाबद्दल शाळेचे सर्व मार्गदर्शक शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे

Advertisement

Advertisement