Advertisement

आजीच्या डोक्यात दगड घालून नातवाने केला खून

प्रजापत्र | Friday, 24/11/2023
बातमी शेअर करा

माजलगाव - ७२ वर्षीय आजीच्या डोक्यात दगड घालून नातवाने आजीचा खून केल्याची धक्कादायक घटना माजलगांव तालुक्यातील लोणगाव घडली आहे. आज ( दि.२३) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथील कौशल्याबाई किसन राऊत (वय ७२) याचा नातु राहुल बाळासाहेब राऊत (वय २९) याच्याशी घरात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. याचा राग मनात धरून राहुल याने आजी कौशल्याबाई राऊत यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर कौशल्याबाई यांचा मृतदेह माजलगांव ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. आईचा खून केल्याप्रकरणी मुलाच्या विरोधात बाळासाहेब राऊत यांनी दिंद्रुड पोलीस ठाण्यात धाव घेतली असून नातवाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Advertisement

Advertisement