Advertisement

आता माजलगावमध्ये नगर परिषदेलाही आग

प्रजापत्र | Monday, 30/10/2023
बातमी शेअर करा

 

 

माजलगाव-मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आता अधिक आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.आज सकाळपासून माजलगावमध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत.सकाळी आ.प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावल्यानंतर शहरात दगडफेक करण्यात आली.काही वाहने जाळण्यात ही आली आहेत.त्यानंतर आता नगर परिषदेला आग लावल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.शांततेत चाललेलं आंदोलन आता हिसंक वळणावर आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

 

 

Advertisement

Advertisement