Advertisement

शेतकरी दिनाच्या औचित्याने शरद पवारांनी केले विशेष ट्विट.

प्रजापत्र | Wednesday, 23/12/2020
बातमी शेअर करा

मुंबई :  मोदी सरकारने  केलेल्या तीन कृषी कायद्या विरोधात शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत . या  आंदोलनासंदर्भात अनेक शिष्टमंडळे शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहेत . सर्व पक्षांनी या आंदोलनाच्या समर्थनार्थ  एकत्र येत भारत बंद पाळला. सत्ताधारी पक्षाकडून आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठका घेण्यात आल्या. या आंदोलनाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत.या आंदोलनादरम्यान शेतकरी दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी  एक विशेष ट्विट केले आहे.
                  “अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. पण आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागतेय. देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा हीच राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो”, असे ट्विट करत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर टीका केली.

 हेही वाचा 

 

Advertisement

Advertisement