Advertisement

सिग्नलवर उभ्या दुचाकीला बसची धडक, एक तरुण जागीच ठार

प्रजापत्र | Tuesday, 22/12/2020
बातमी शेअर करा

औरंगाबाद : मंगळवारी दुपारच्या सुमारास सिडको बस स्टँडजवळ भीषण अपघात झाला. सिडको बस स्थानकातून बस निघाली होती. दरम्यान सिग्नलवर उभ्या दुचाकीला बसने धडक दिली
           शहरातील सिडको बस स्टँडजवळ भीषण अपघात झाला आहे. बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी आहे. त्याला घाटी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या बसने धडक दिल्यानंतर उपस्थित लोकांनी संतप्त होऊन बसच्या काचा फोडल्या आहेत.दरम्यान सिग्नलवर उभ्या दुचाकीला बसने धडक दिली. बसचा वेग जास्त होता. यावेळी बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीला जोरदार धडक बसल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाचे नाव शुभम शिंदे आहे. त्याला उपचारांसाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

Advertisement

Advertisement