Advertisement

गळफास घेऊन शेतमजुराची आत्महत्या

प्रजापत्र | Monday, 25/09/2023
बातमी शेअर करा

माजलगाव - अज्ञात कारणाने एका शेतमजुराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान शहरापासून जवळ असलेल्या कॅनल जवळच्या शेतात घडली.

सुहास सुदाम काळे (वय-४२) हे शेतमजूर असून माजलगाव शहरापासून जवळ असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतावर शेतमजूर म्हणून काम करत होते.त्याठिकाणी ते आपल्या कुटुंबासह शेतात राहत होते. आज सकाळी 6 वाजता शेतातील झाडाला त्यांचा गळफास घेतलेला मृतदेह त्यांच्या पत्नीच्या निदर्शनास आला. मृतदेहाचे शव्च्छेदन करण्यात आले असून पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. मात्र आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Advertisement

Advertisement