Advertisement

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते प्रशांत दामले कोरोना पॉजिटीव्ह

प्रजापत्र | Friday, 18/12/2020
बातमी शेअर करा

मुंबई : मराठी सिनेश्रुष्टीतील  प्रसिद्ध अभिनेते तसेच टीव्ही रिऍलिटी शोमध्ये झळकणारे प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील आठवड्यात कणकण जाणवत असल्यामुळे दामले यांनी चाचणी केली होती या चाचणीत त्यांचा अहवाल पॉजिटीव्ह आल्याचे दामले यांनी सांगितले 
                        एका लग्नाची गोष्ट,सिनेमा फेम आणि आम्ही सारे खवय्ये या मालिकेतून घराघरात पोहोचलेले प्रशांत दामले याना गेल्या आठवड्यात  एका नाटकाच्या  प्रयोगा दरम्यान ताप आणि अंगदुखी जाणवत असल्याने त्यांनी टेस्ट केली होती यात दामले पॉजिटीव्ह आढळले असून डॉक्टरांनी त्यांना  सात दिवसांसाठी होम आयसोलेशन मध्ये राहण्यास सांगितलं आहे. 

शाळेपासूनच मी काठावर पास होत आहे या परीक्षेतही मी काठावर पास झालो आहे.पण हि हि परीक्षा जरा अवघड आहे, तरीसुद्धा मी यातून मार्ग काढेन. यातच चांगली गोष्ट म्हणजे माझे सगळे सहकलाकार आणि इतर लोक निगेटिव्ह आहेत. माझी तब्येत आता ठीक आहे पण डॉक्टर म्हणतात तुला आरामाची गरज आहे. मी काळजी घेत आहे तुम्ही सुद्धा काळजी घ्या असे दामले एक विडिओ शेअर करत म्हणाले.  
 

Advertisement

Advertisement