Advertisement

अंबाजोगाई न्यायालय परिसरात युवकाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न

प्रजापत्र | Wednesday, 30/08/2023
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - अंबाजोगाई न्यायालय परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला असून चक्क युवकाने अंगावरती डिझेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न आज सकाळी ११ वाजताच्या दरम्यान केला आहे. हा प्रकार अंबाजोगाई जिल्हा न्यायालयाच्या परिसरात घडला. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस घटनास्थळी दाखल होत युवकाला ताब्यात घेतले आहे. किशोर सुधाकर झिंजुर्डे (वय ३०, रा. कौठळी, ता. परळी) असं युवकाचे नाव आहे.

 

परळी तालुक्यातील कौठळी येथे विहिरीवर पाणी आणण्याच्या कारणातून (दि.३१ जुलै २०२१) रोजी किशोर आणि वडील सुधाकर झिंजुर्डे यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर सुधाकर झिंजुर्डे यांच्या फिर्यादीवरून संजय वैजेनाथ गित्ते (वय ४२), बाळू वैजेनाथ गित्ते (वय ४३), यांच्यासह अनोळखी तिघांवर (दि.९ ऑगस्ट २०२१) रोजी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झालेला आहे.
या घटनेचा जातीअंत संघर्ष समितीचे निमंत्रक बब्रुवान पोटभरे यांनी निषेध नोंदवला आहे. दरम्यान, भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाले आहेत. मागासवर्गीयांवरील अन्याय, अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. नगर जिल्ह्यातील घटना ताजी असतानाच हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. 

Advertisement

Advertisement