Advertisement

जिजाऊ मल्टीस्टेट पाठोपाठ गेवराईमधील ही अर्बन निधी बँक बुडाली

प्रजापत्र | Wednesday, 26/07/2023
बातमी शेअर करा

बीड - सरकारक्षेत्र वाढाव यासाठी केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या निधीअर्बन, मल्टीस्टेट या बँकांना परवानगी देण्यात येते परंतु बीड जिल्ह्यामध्ये याचा काहीजण गैरवापर करत खासगी सावकारकी करण्याचा प्रयत्न करत आहेत. जिजाऊ मल्टीस्टेटचे प्रकरण ताजे असतानाच गेवराई येथील श्रीमंतयोगी अर्बन निधी लिमिटेड बँकेने सहाशे ठेवीदारांची फसवणूक करत पळ काढला आहे. श्रीमंत अर्बन निधी लिमिटेडचे अजित काळे यांनी बीड जिल्ह्यासह बुलढाण्यातील शेकडो युवकांना स्पर्धापरीक्षेमध्ये नोकरी लावतो असे आमिष देवून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी श्रीमंत अर्बन निधीमध्ये ठेवून घेतल्या होत्या. यानंतर नोकरीही गेली आणि बँकेत ठेवलेली रक्कमही गेल्यामुळे आज फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेवून पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली.

स्पर्धा परीक्षामध्ये तुमच्या मुलांना नोकरी लावून देतो, एमएससीमध्ये माझी खुप चलती आहे यासह इतर गप्पा मारत गेवराई येथील श्रीमंतयोगी अर्बन निधीचे अध्यक्ष अजित काळे यांनी जवळपास सहाशे युवकांना अशा मोठमोठ्या गप्पा मारत जाळ्यात अडकवले, काळे यांच्या आमिषाला बळी पडत अनेक युवकांनी अजित काळे म्हणतील तसे करत श्रीमंत योगी अर्बन निधीच्या ठिकाणी मोठ्या ठेवी ठेवल्या होत्या. परंतु या युवकांना काळेंनी नोकरीही दिली नाही यासह बँकेत ठेवलेला पैसाही न देता जिल्ह्यातून पळ काढला. गेल्या काही महिन्यांपासून श्रीमंत योगी अर्बन निधीचे अध्यक्ष काळे हे गायब असल्याने संबंधित ठेवीदार चिंताग्रस्त होते. आज पैसा येईल उद्या येईल ते या आशेत होते परंतु आज त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात येत फसवणूक झाल्याची तक्रार दिली.

 

Advertisement

Advertisement