Advertisement

व्यापाऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

प्रजापत्र | Monday, 17/07/2023
बातमी शेअर करा

गेवराई - शहरातील एका 55 वर्षीय व्यापाऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली असून सदरील व्यापार्‍याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

बबन साहेबराव कागदे (रा.स्वराज्यनगर, शहागड ता. गेवराई) असे आत्महत्या केलेल्या व्यापार्‍याचे नाव आहे. कागदे यांनी आज सकाळी आपल्या घराच्या गच्चीवर जावून विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना उपचारार्थ बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते. मात्र तत्पूर्वीच ते मरण पावले होते. मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात (district Hospital) शवविच्छेदन करण्यात आले. कागदे हे जनावरे खरेदी-विक्रीचा व्यापार करीत होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. 

Advertisement

Advertisement