Advertisement

मालट्रक मोटारसायकल धडकेत एक जागीच ठार

प्रजापत्र | Saturday, 10/06/2023
बातमी शेअर करा

आष्टी - शहरातील जामखेड - नगर रोडवर असलेल्या डॉ.आंबेडकर चौकात आज सकाळी १० च्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात मोटार सायकलस्वार ट्रक खाली येऊन जागीच ठार झाला. 
प्रथमदर्शींच्या म्हणण्यानुसार ट्रक चालक हा दारूच्या नशेत होता. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. सिमेंट वाहतुक करणारा ट्रक ( एमएच १६ सीडी २४६६) हा जामखेडकडे चालला होता. भरधाव ट्रक आष्टी शहरातील आंबेडकर चौकात आल्यानंतर समोरून मोटारसायकल ( एमएच २३ एएम ९७१९) वरून आलेल्या रामकिसन काकडे, रा शिदेवाडी ( वय ६६ वर्षे ) यांना या ट्रकने चिरडले. यावेळी काकडे यांच्या डोक्यावरून ट्रकचे पाठीमागचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले तर मृतदेह येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात 
आला आहे. 

Advertisement

Advertisement