Advertisement

२५ वर्षे सुरक्षित सेवेबद्दल एसटी चालकांचा उद्या गौरव 

प्रजापत्र | Friday, 02/06/2023
बातमी शेअर करा

बीड दि.२ (प्रतिनिधी)-ज्या चालकांची २५ वर्षे विनाअपघात सेवा झाली आहे, अशा चालकांच्या कार्याची दखल घेऊन उद्या (दि.३) बीडमध्ये कार्यगौरव सोहळा एसटी महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. २५ वर्षापेक्षा जास्त विनाअपघात सेवा करणाऱ्या ३५ चालकांना २५ हजारांचे रोख बक्षीस,सन्मानपत्र,स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी दिली.उद्या सकाळी ११ वाजता राज्य परिवहन विभागाच्या विभागीय कार्यालयात हा सन्मान सोहळा पार पडणार आहे.

 

 

 

                 एसटी महामंडळातर्फे एकूण सेवेमध्ये सलग २५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत विनाअपघात सेवा बजाविणाऱ्या बीड जिल्ह्यातील एकूण ४७ कर्मचाऱ्यांचा गौरव उद्या करण्यात येणार असून यातील ३७ चालकांना रोख २५ हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे.प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, बिल्ला यासह पत्नीला साडी असे या सत्काराचे स्वरूप आहे. एसटी महामंडळाच्यावतीने अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी दिली.

Advertisement

Advertisement