Advertisement

माजलगाव खरेदी विक्री संघ निवडणूक; दुपारपर्यंत झाले इतके मतदान

प्रजापत्र | Sunday, 23/04/2023
बातमी शेअर करा

माजलगाव,दि.२३: येथील माजलगाव खरेदी विक्री संघासाठी सकाळ पासूनच मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला. आज दुपारी १२.३० वाजेपर्यंत वयक्तिक मतदार संघासाठी १७४९ पैकी ९६० तर संस्था मतदार संघासाठी ४७ पैकी ४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात बूथ क्रमांक १ मध्ये संस्था मतदार संघासाठी ४८ पैकी ४५ तर  बूथ क्र.२  ४४२ पैकी २५०,बूथ क्र.३ ४५० पैकी २६५ ,बूथ क्र.४ ४५० पैकी २२९ ,बूथ क्र.५ ४०७ पैकी २१६ मतदान झाले आहे. 

 

माजलगाव तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपकडून ताकत लावली असून प्रतिष्ठेची केली आहे. आठ दिवसांवर बाजार समितीची मतदान असल्याने खरेदी विक्री संघ निवडणुकीच्या विजयाचा परिणाम होणार असल्याने आज (दि.२३) सकाळी ८ वाजल्यापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुरुवात झाली, असता सकाळपासून भाजपचे मोहन जगताप, रमेश आडसकर, ओमप्रकाश शेटे यांच्यासह कार्यकर्ते तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ.प्रकाश सोळंके, जयदत्त नरवडे, संभाजी शेजुळ कार्यकर्ते तंबूत तळ ठोकून आहेत.

 

दुपारी १२.३० वाजेपर्यंत वयक्तिक मतदार संघातील ६ जागेसाठी १७४९ पैकी ९६० मतदारांनी हक्क बजावला तर वयक्तिक मतदार संघातील ९ जागेसाठी ४७ पैकी ४५ मतदारांनी हक्क बजावला आहे. मतदारांच्या उन्हाचा पारा वाढत असताना ही मतदार मात्र मतदान करण्यासाठी उत्साह दिसून येत आहे.

Advertisement

Advertisement