Advertisement

वीज पडून महिला ठार

प्रजापत्र | Thursday, 20/04/2023
बातमी शेअर करा

परळी दि.20 (प्रतिनिधी): मागील दोन दिवसांपासून वीज पडून महिला ठार होत असल्याच्या घटना जिल्ह्यामध्ये घडत आहेत. आष्टी तालुक्यात काल दोघींचे प्राण गेल्यानंतर गुरूवारी परळी तालुक्यातील वडगाव दादाहरी येथील एका 55 वर्षीय महिलेचा वीज अंगावर पडल्याने मृत्यू झाला आहे.
संगीता शिवाजी आमले (वय 55) ही महिला गुरूवारी सायंकाळी शेतात काम करत असतांना तिच्या अंगावर वीज पडल्याने जागीच गतप्राण झाली. दरम्यान या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत असून मागच्या दोन दिवसात जिल्ह्यात तीन महिलांनी प्राण गमावले आहेत. 

Advertisement

Advertisement