Advertisement

शेतकऱ्या पाठोपाठ 25 वर्षीय उद्योजक तरुणाची आत्महत्या

प्रजापत्र | Thursday, 20/04/2023
बातमी शेअर करा

किल्लेधारुर दि.20 एप्रिल – धारूर तालुक्यात 25 वर्षीय उद्योजक असलेल्या तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. तालुक्यातील अंबेवडगाव गावात आज पहाटे अंदाजे पाच वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. धारुर (Dharur) तालुक्यातील रेपेवाडीत शेतकरी आत्महत्येनंतर आज दिवसभरातील ही दुसरी आत्महत्या उघडकीस आली आहे.( Suicide … Shocking … Suicide of a 25-year-old entrepreneur in Dharur taluk.)

 

 

स्वतःचा नवीन कुक्कुटपालन उद्योग (Poultry Shed) सुरु करण्याच्या तयारीत असलेल्या उद्योन्मुख तरुण उद्योजकाने त्याच शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आठ महिन्यापासून सुखदेव नायकोडे (वय 25) हा कुक्कुटपालनाचे शेड (Poultry Shed) उभारत होता. शेडचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले होते . शेडमध्ये कोंबडीचे पिल्ले (पक्षी ) आज दि.20 रोजीच येणार होते अशी माहिती मिळाली. परंतू आजच त्याने त्याच शेड मध्ये गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, छोटा तीन वर्षाचा मुलगा आहे. त्याच्या आत्महत्येमुळे कुटूंबीयांना धक्का बसला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. प्रेत शवविच्छेदनासाठी धारुर ( Dharur ) ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
 

Advertisement

Advertisement