Advertisement

उंदरखेल तलावात कुजलेल्या अवस्थेत आढळला पुरूषाचा सांगडा

प्रजापत्र | Thursday, 06/04/2023
बातमी शेअर करा

कडा - तलावातील दगडी पिचगला झाडाझुडपात अडकलेला एक पुरुष जातीचा सांगडा गुरूवारी सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली असून अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. 

 

      आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथील तलावात मच्छिमारी करत  असलेल्या लोकांना गुरूवारी सकाळी  दगडी पिंचीगच्या भोवताली असलेल्या बेशरमाच्या झाडाझुडपात एक सांगडा असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी गावातील लोकांना माहिती दिली.त्यानंतर ही माहिती गावातील लोकांनी अंभोरा पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता अंदाजे ५५ ते ६० वर्षीय पुरूष जातीचे असून तो फक्त सांगडा असल्याने पंचनामा करून मृतदेह अंबाजोगाई येथे पाठविण्यात आला आहे.
    घटनास्थळी अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे, पोलिस उपनिरीक्षक रवि देशमाने, अंमलदार शिवदास केदार, अंमलदार अमोल  शिरसाठ यांनी भेट दिली.

 

Advertisement

Advertisement