Advertisement

दुचाकी अपघातात तरुण जागीच ठार

प्रजापत्र | Tuesday, 28/03/2023
बातमी शेअर करा

गेवराई - तालुक्यातील गढी माजलगाव या हायवेवर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अर्धमसला शिवारात रूई येथील एका तरुणाचा अपघात होऊन मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. 
कृष्णा विठ्ठल गायकवाड (वय-२७) राहणार रूई तालुका गेवराई जिल्हा बीड असे मयत तरुणाचे नाव असुन हा तरूण आपल्या मोटार सायकलवर बीडला परिक्षा देण्यासाठी जात असतांना मध्येच अर्धमसला शिवारात आज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा अपघात झाला. ही घटना आज सकाळी १० च्या सुमारास घडली आहे. सदरचा तरूण हा संभाजीनगरला एका खाजगी कंपनीत काम करत असल्याची सांगण्यात येत आहे. मृत तरुणाला शवविच्छेदन करण्यासाठी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. 

Advertisement

Advertisement