Advertisement

तीन लाखांच्या खंडणीसाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीच्या १४ तासांत आवळल्या मुसक्या

प्रजापत्र | Monday, 27/03/2023
बातमी शेअर करा

 कडा - तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातुन २५ रोजी  अपहरण केल्याची घटना घडली होती.आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत आरोपीच्या सिनेस्टाईल पध्दतीने अवघ्या १४ तासाच्या रविवारी दुपारी तीनच्या दरम्यान  भिगवण येथुन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आष्टी पोलिसाच्या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

     आष्टी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे २५ मार्चच्या रात्री अज्ञात कारणांसाठी अपहरण झाले होते. आष्टी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता.तांत्रिक माहितीचा आधार घेत थेट भिगवण  गाठले. मुलीच्या वडिलांना खंडणीपोटी वारंवार वेगवेगळ्या फोन वरून तीन लाख रूपये खंडणीची  मागणी करत असलेल्या आरोपीला रविवारी दुपारच्या  दरम्यान आष्टी पोलिसांनी सापळा रचून आम्ही पैसे घेऊन भिगवण इंदापूर रोडवर उभा असल्याचे सांगितले.आरोपी पैसे घ्यायला येताच त्याच्या मुसक्या आवळल्या.व तेथील एका हाॅटेल मधील खोलीत मुलीला कोंडुन ठेवले होते. तिला ताब्यात घेऊन सुखरूप सुटका करत वडिलाच्या ताब्यात देण्यात आले.अवघ्या १४ तासांच्या आत सिनेस्टाईल पध्दतीने आष्टी पोलिसांनी  सापळा रचुन ही कारवाई केली. भिगवन येथील आरोपी आकाश बंडगर वय वर्ष २६  याला ताब्यात घेतले आहे.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्यदक्ष पोलिस उपनिरीक्षक अजित चाटे, पोलिस नाईक प्रवीण क्षीरसागर, पोलिस अंमलदार शिवप्रकाश तवले, पोलिस नाईक विकास जाधव, महिला पोलिस हवालदार स्वाती मुंडे, पोलिस अंमलदार सचिन कोळेकर यांनी  केली.आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे करीत आहेत.

 

Advertisement

Advertisement