Advertisement

आष्टी - जामखेड रोडवर पादचारी व्यक्तीस अज्ञात वाहनाने चिरडले

प्रजापत्र | Tuesday, 21/03/2023
बातमी शेअर करा

आष्टी - तालुक्यातील आष्टी - जामखेड रोडवर सोमवारी ( दि. २०) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास पोखरी फाटा शिवारात पादचारी व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. मृताची ओळख अद्याप पटली नाही. 

पोखरी शिवाराजवळील आष्टी-जामखेड रोडवरून एक व्यक्ती रात्री ११. ३० वाजेच्या सुमारास चालत जात होता. यावेळी अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. यात पायाला व डोक्याला गंभीर इजा होऊन पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. दरम्यान, मृताची ओळख अदयाप पटलेली नाही. मृताच्या अंगात पांढरा टिपके असलेला काळा शर्ट, काळी पँट, बांधा सडपातळ, उंची ५ फूट २ इंच, रंग काळा सावळा आहे. याबाबत अधिक माहिती असल्यास पो.ह. विकास राठोड ( ८८८८८८२२३९ ) व पो.अ.गुजर ( ८८८८८८२२३९) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन आष्टी पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

 

Advertisement

Advertisement