Advertisement

वीज कोसळून १ म्हैस ठार

प्रजापत्र | Friday, 17/03/2023
बातमी शेअर करा

माजलगाव - गेल्या 3 दिवसापासून अवकाळी पाऊस तसेच गाराचा पाऊस पडत असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. यात आज दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान तालुक्यात वाघोरा येथील शेतकरी सय्यद शमशेर सय्यद सिकंदर  हे म्हैस चरण्यासाठी शेतात गेले होते त्याच दरम्यान जोराची हवा तसेच विजेचा कडकडाट झाला आणि चरत असलेल्या म्हशीच्या अंगावर वीज पडून म्हैस जाग्यावरच मरण पावली आहे.

या घटनेत शेतकरी सय्यद शमशेर सय्यद सिकंदर यांचे तब्बल 80 ते 90 हजाराचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी तलाठी व वैदकीय अधिकारी यांनी भेट दिली असून पंचनाम्याची प्रक्रिया चालू आहे.

Advertisement

Advertisement