Advertisement

अशोक शेजुळ हल्ला प्रकरणात आ. सोळंकेंसह त्यांच्या पत्नीवर गुन्हा

प्रजापत्र | Wednesday, 08/03/2023
बातमी शेअर करा

माजलगाव: राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या संस्थांमध्ये कोटयावधीचा घोटाळा झाल्याचा आरोप करणारे भाजप कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावरील हल्ला प्रकरणात अखेर आ. प्रकाश सोळंके, त्यांच्या पत्नी मंगला सोळंके, व्यापारी रामेश्वर टवाणी यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असतानाच हा गुन्हा दाखल झाल्याने आता त्याचे पडसाद विधीमंडळातही उमटणार आहेत. 

माजलगाव येथील भाजपा नेते अशोकराव शेजुळ यांच्यावर शाहूनगर येथे ते आपल्या स्कुटीवर जात असताना मोटरसायकल वरून पाठीमागून आलेल्या पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांनी राॅडच्या साह्याने त्यांचा हातापायावर जबर मार देऊन एक पाय मोडला आसुन त्यांच्या डोक्यावर जबर मार लागला असून त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरु आहेत. 

सदर हल्ला हा आ. प्रकाश सोळंके यांनीच घडवून आणल्याचे अशोक शेजुळ यांनी सांगितल्यानंतर पोलीसांनी अखेर आ. प्रकाश सोळंके यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

Advertisement