Advertisement

कांद्याच्या भावासाठी शिवसंग्रामचा रास्तारोको

प्रजापत्र | Sunday, 05/03/2023
बातमी शेअर करा

आष्टी दि.५(प्रतिनिधी)-सध्या राज्यात कांदा उत्पादकांवर रडण्याची वेळ आली असून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कवडीमोल दरामुळे शिवसंग्रामच्या वतीने कड्यात ज्ञानेश्वर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली एक तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.यावेळी नाफेड मार्फत कांदा खरेदी केंद्र चालू करावे अशी मागणी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशीद यांनी केली असून शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढण्याचा इशारा चौधरी यांनी यावेळी दिला.

     या आंदोलनासाठी आ.बाळासाहेब आजबे , मा.आ.साहेबराव दरेकर, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशीद , बीड तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, शिरूर कासारचे तालुकाध्यक्ष माऊली शिंदे , प्रा.पंडित शेंडगे व शिवसंग्रामचे पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या आंदोलनाचे आयोजक आष्टीचे शिवसंग्राम तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी आपल्या मनोगतात म्हटले की,आष्टी तालुक्यात जास्तीत -जास्त कांदा पिकवला जातो आणि ज्या वेळेस कांदा विक्रीला येतो नेमका त्याच वेळेस भाव कमी होतो . शासनाने राज्य सरकार व केंद्र सरकारने वेळीच लक्ष घालून कांद्याची निर्यात सुरू करावी नाफेड मार्फत कांदा खरेदी करावा शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा आम्ही जरी घटक पक्षात असलो तरी सुद्धा स्वर्गीय मेटे साहेबांची शिकवण आहे की गोरगरीब वंचित उपेक्षित कामकरी कष्टकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या पाश्चात ही आज आम्ही शिवसंग्रामचे मावळे त्यांनी शिकवलेला संघर्ष केंद्रस्थानी मानून आज शेतकरी बांधवांना न्याय मिळण्यासाठी हा रास्ता रोको आंदोलन शेतकरी बांधवांच्या व आपल्या सर्वांचे उपस्थितीमध्ये करत आहोत यावर लवकरात - लवकर सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल असा निर्वाणीचा इशारा ज्ञानेश्वर दादा चौधरी यांच्या वतीने देण्यात आला आहे .

    या आंदोलनात काशिद यांनी,खऱ्या अर्थाने निर्यात बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. नाफेड ही कांदा खरेदी करते परंतु ती सध्या स्थितीमध्ये कांदा खरेदी करत नाही . नाफेडने ती लवकरात - लवकर सुरू करावी तसेच भारता शेजारील देशांमध्ये कांदा मिळत नाही कांद्याला बाहेर देशात खूप मागणी आहे . केंद्र शासनाने निर्यात सुरू करावी कांद्याला कमीत कमी 20 रुपये किलो भाव मिळावा . कांदा ही नाशवंत वस्तू आहे तिला जास्त दिवस ठेवता येत नाही म्हणून सरकारने लवकर यावर निर्णय घेऊन नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरू करावी अशी मागणी करत पंजाब -हरियाणा प्रमाणे बीड जिल्ह्यातील बरोबर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येणे गरजेचे आहे असे आवाहन केले.याप्रसंगी सुनिल नाथ, अंकुश खोटे,माऊली थोरवे,अशोक चौधरी,परमेश्वर घोडके,मयूर चव्हाण,राजू म्हस्के,बाबू धनवडे,महादेव साके,माऊली गायकवाड, बाळू बोरुडे, परमेश्वर कर्डिले, ठकाराम दुधावडे, संतोष चौधरी पाटील, संकेत चौधरी,राहुल चौधरी,ऋषी गर्जे, सुदाम चव्हाण, भैरवनाथ वाघ, शिवाजी म्हस्के, नागेश कर्डिले,सागर पांडुळे,विजय विधाते,बंटी गायकवाड,छगन कर्डिले,प्रा.पंडीत शेंडगे,हरी देसाई,आकाश पडोळे आदींची उपस्थिती होती. 

Advertisement

Advertisement