Advertisement

रक्ताच्या थारोळ्यात आढळेल्या मृतदेहाची ओळख पटेना

प्रजापत्र | Monday, 20/02/2023
बातमी शेअर करा

कडा - म्हसोबावाडी-सावरगाव रस्त्यावरील वेलतुरी शिवारात गुरूवारी सकाळी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी शवविच्छेदनानंतर अज्ञात आरोपी विरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मृताची ओळख अद्याप पटली नाही. 

 

 

आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी-सावरगाव रस्त्यावरील वेलतुरी शिवारातील शेतात १६ फेब्रुवारी रोजी एका ३५ वर्षीय तरूणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला होता. मृताच्या ओळख अद्याप पटली नाही. दरम्यान, बीड जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनानंतर तरूणाच्या डोक्यात खोलवर जखम असल्याचे निष्पन्न झाले. यावरून रविवारी अंभोरा पोलिस ठाण्यात पोलिस अंमलदार लुईस पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे करीत आहेत.

मृतदेहाची ओळख पटेना
अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत आढळून आलेल्या अनोळखी तरूणाची ओळख पटवण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरु आहे. बीड, नगर जिल्ह्यात माहिती घेण्यात आली असून अद्याप देखील ओळख पटली नाही. मृताबद्दल माहिती असल्यास अंभोरा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement