Advertisement

उभ्या ट्रॉलीला दुचाकीची धडक

प्रजापत्र | Friday, 17/02/2023
बातमी शेअर करा

वडवणी - वडवणी तालुक्यातील कुप्पा फाट्याजवळ उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉली क्र.एमएच 23 क्यू 8013 ट्रॉलीला पाठीमागून येणार्‍या दुचाकी क्र एमएच 20 एफई 8805 ने जोराची धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री घडली. या अपघातामध्ये मोटारसायकलवरील घुगे शिवजी वय अंदाजे 45 वर्ष रा सोनखेड ता.सोनपेठ जि. परभणी या इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह श्वविच्छेदन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात हालवला होता. हा अपघात एवढा भिषण होता की इसमाचे डोके फुटून मेंदू अक्षरशा बाहेर पडला होता. मन हेलावून टाकणारी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Advertisement