Advertisement

चिंचाळ्यात भर दिवसा चोरी

प्रजापत्र | Saturday, 11/02/2023
बातमी शेअर करा

वडवणी - दुसर्‍याच्या शेतात काबाड कष्ट करण्यासाठी गेलेल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यानी घराचे कुलूप तोडून प्रवेश करत पेटीमध्ये 17 ग्रँम सोनेसह 40 हजार नगदी असे एकुण 65 हजारांची चोरी भरदिवसा चिंचाळा येथे घडली आहे.या प्रकरणी वडवणी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण मसाजी आव्हाड यांचे घर चिंचाळा शिवारात शेतामध्ये आहे. काल घरातील मंडळी दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला गेले होते. यांचाच फायदा घेऊन चोरट्यानी पाठीमागील घराची कडी कोढा तोडून घरात प्रवेश केला घरातील पेटीमध्ये नगदी 40 हजार रुपयासह दुसऱ्या पेटीतील झुंबर जोड,नथणी,पोत असे एकुण 25 हजाराचे सोनेएकुण 65 हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी लंपास केला आहे.सदरील घटना हि नारायण आव्हाड यांच्या पत्नी सौ.कुसूम आव्हाड ह्या शेतातून काम करुन आल्यानंतर सदरील प्रकार उघडकीस आला आहे.हि घटना काल सकाळी 10 ते सायं 6 वाजण्याच्या सुमारास घडली असल्याने नारायण मसाजी आव्हाड यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्या विरोधात वडवणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास पो.ह.डोळस हे करत आहेत.

Advertisement

Advertisement