Advertisement

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक

प्रजापत्र | Saturday, 11/02/2023
बातमी शेअर करा

गेवराई -  भरधाव वेगाने निघालेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेजण ठार झाले तर अन्य एकजण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील दैठणा फाट्याजवळ शुक्रवारी रात्री घडली. जखमीला उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील विठ्ठल शामराव माळी (वय42), राहुल नवनाथ वरकटे (वय29), विशाल साईनाथ वरकटे हे तिघेजण दुचाकीवरुन दैठणा फाट्यावरुन शुक्रवारी (दि.10) सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास कामावरुन घरी जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान दैठणा- लुखामसला रस्त्यावरील म्हसोबा मंदिराजवळ त्यांची दुचाकी येताच भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात विठ्ठल माळी यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर राहुल वरकटे आणि विशाल वरकटे दोघे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान राहुल वरकटे यांचा मृत्यू झाला. विशालवर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे लुखामसला गावावर शोककळा पसरली आहे.

Advertisement

Advertisement