Advertisement

स्विफ्ट आणि दुचाकीचा अपघात

प्रजापत्र | Saturday, 28/01/2023
बातमी शेअर करा

गेवराई - चार चाकी व दुचाकी मध्ये धडक होऊन एक महिला ठार तर एक जण गंभीर जखमी सह 3 जण जखमी झाल्याची घटना माजलगाव रोडवर शुक्रवारी
5 वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये सुशीला अश्रुबा उबाळे या जागीच ठार झाल्या तर त्यांचा नातू संतोष उबाळे याचे उपचारा दरम्यान निधन झाले तरी गाडीतील दोनजन गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारासाठी त्याना बीड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष उबाळे हे त्यांच्या दुचाकीवरून आजीला घेऊन गेवराई येथे डोळ्याची तपासणी करण्यासाठी आले होते.ती तपासणी करून भेंडटाकळी येथे दिनांक 27 जानेवारी शुक्रवार या दिवशी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास भेंड टाकळी येथे जात असताना माजलगाव येथून लग्न समारंभ उरकून स्विफ्ट गाडी मधून विहामांडवा येथे माजलगाव रोडवर गेवराई भेंडटाकळी कडे दुचाकी वर जात असताना संतोष धर्मराज उबाळे वय वर्षे (30) रा.भेंडटाकळी व आजी सुशीला उबाळे वय वर्ष 65 राहणार भेंडटाकळी यांना स्विफ्ट गाडीने जोराची धडक दिली .यामध्ये सुशीला अश्रुबा उबाळे या जागीच ठार झाल्या तर संतोष उबाळे याचे उपचारा दरम्यान निधन झाले आहे कार मधील जखमी उपचारासाठी बीड येथे हलवण्यात आले असून. स्विफ्ट गाडी मधील तीन जण जखमी झाले असून एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

Advertisement

Advertisement