Advertisement

'परिक्षा पे चर्चा' उपक्रमातंर्गत परळीत चित्रकला स्पर्धा

प्रजापत्र | Wednesday, 25/01/2023
बातमी शेअर करा

परळी वै-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 'परिक्षा पे चर्चा ' या उपक्रमांतर्गत शहरात बुधवारी (दि.२५) पार पडलेल्या चित्रकला स्पर्धेत विविध शाळा, महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खासदार डॉ.प्रितम मुंडे यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी प्रगतीपथावरील भारत आपल्या उत्तमोत्तम चित्रातून रेखाटला.
      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात सर्वत्र शाळा व महाविद्यालय स्तरावर  'परिक्षा पे चर्चा' हा उपक्रम घेण्यात येत आहे. पंकजा मुंडे व खा.डॉ.प्रितम मुंडे यांच्या आवाहनानुसार बुधवारी (दि.२५) शहर व मतदारसंघात देखील हा उपक्रम राबविण्यात आला, त्याअंतर्गत शहरातील विविध दहाहून अधिक शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. आझादी का अमृतमहोत्सव, सर्जिकल स्ट्राईक, कोरोना लसीकरणात भारत नंबर एक, स्वच्छ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत, बेटी बचाओ बेटी पढाओ आदी विषय स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते. सुमारे एक हजार ३३५  विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक, शैक्षणिक व विविध समाजोपयोगी संदेश देणारे चित्र रेखाटले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या टीमने ज्यात  नगरसेवक पवन मुंडे,महादेव इटके, नितीन समशेट्टी, सचिन गित्ते, पवन मोदानी, मोहन जोशी, अरुण पाठक, अनिश अग्रवाल, योगेश पांडकर, वैजनाथ रेकने, अश्विन मोगरकर, विकास हालगे, गोविंद चौरे, सुशील हरंगुळे, पवन  तोडकरी, दिलीप नेहरकर, श्रीपाद शिंदे, नितीन मुंडे, राहूल घोबाळे  यांच्यासह भाजप पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले.

Advertisement

Advertisement