Advertisement

कुत्र्याच्या हल्ल्यातून वाचवून हरणाच्या पिल्लास जीवनदान

प्रजापत्र | Tuesday, 17/01/2023
बातमी शेअर करा

केज (प्रतिनिधी) - केज परिसरात हरणाच्या कळपातून चुकलेल्या हरणाच्या पिल्लावर कुत्र्यांनी हल्ला सुरू केला. एका शिक्षकाने कुत्र्याच्या तावडीतून पिल्लाला वाचवून जखमेवर उपचार करून ते पिल्लू वनविभागाच्या ताब्यात दिले. 

       केज शहरातील शिक्षक बाळकृष्ण चोले हे धारूर रस्त्यावरील शेतातून येत असताना रविवारी दुपारी हरणाच्या कळपातून चुकलेल्या हरणाच्या पिल्लाच्या मागे कुत्रे लागले होते. कुत्र्यांनी हल्ला करीत हरणाचे पिल्लू जखमी केले होते. त्यांनी कुत्र्याच्या तावडीतून हरणाच्या पिल्लाची सुटका करून जखमी पिल्लू घरी आणले. त्याच्यावर प्रथमोपचार करून सर्पमित्र सूरज कदम यांना फोन करून ही माहिती दिली. कदम आणि माऊली इगवे या तरुणांनी चोले यांच्या घरी गेले. त्यांनी हे पिल्लू घेऊन धारूरच्या वन विभागाशी संपर्क साधला. या पिल्लास वन विभागाच्या ताब्यात देऊन जीवनदान दिले. 

Advertisement

Advertisement