Advertisement

जीप - कारचा भिषण अपघात

प्रजापत्र | Wednesday, 11/01/2023
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) -  दाऊतपुर येथील थर्मलच्या राखेने दादाहरी वडगाव येथील आणखी एका युवकाचा बळी घेतला आहे. क्रुझर जिप आणि स्विफ्ट डिझायर कारचा भिषण अपघात होऊन एकजण जागीच ठार झाला तर सुमारे 12 जण जखमी झाले आहेत. यात महिलांचाही समावेश आहे. दरम्यान संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. संबंधित दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरीकांची आहे.

 

याबाबत प्राप्त माहिती अशी की, मंगळवार दि. 10 जानेवारी रोजी रात्री 10 ते 10.30 च्या दरम्यान परळी वैजनाथ – गंगाखेड रोडवर दादाहरी वडगावच्या जवळ परळीकडून वडगावकडे जाणारी स्विफ्ट डिझायर (क्रं. एम. एच. 26 – एके – 2666) आणि क्रुझर जीप (क्रं. एमएच 20 – इजे – 1084) यांचा भिषण अपघात झाला. यात अपघातात दादाहरी वडगाव येथील किशन इंगळे (वय 32) या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर जीपमधील सुमारे 12 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने दवाखान्यात हलवण्यात आले.दरम्यान थर्मलच्या राखेने वाहनांचा अंदाज न आल्याने अपघात झाल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
 

Advertisement

Advertisement