Advertisement

वैद्यनाथच्या भाविकांसाठी आता 'हा' नियम

प्रजापत्र | Sunday, 25/12/2022
बातमी शेअर करा

परळी वै.दि.२५ (प्रतिनिधी)-देशात कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएन्ट बीएफ ७ संक्रमित झाला असल्याने शासनाकडून आता खबरदारीचा इशारा म्हणून दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आता वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर प्रशासनानेही इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नियमानुसार बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये येणाऱ्या सर्व भाविक, भक्त, महंत, पुजारी आणि कर्मचाऱ्यांना मंदिर परिसरात मास्क सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे वैद्यनाथ मंदिर आणि परिसरात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नसल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
सध्या भारतात कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएन्ट बीएफ-७ संक्रमित झाला आहे. त्यामुळे प्रभू वैद्यनाथ मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येकानी कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या सुचनांचे व कोरोना बीएफ-७ व्हेरियंटच्या अनुषंगाने उपाय योजनाचे पालन व्हावे यासाठी मंदिर आणि परिसरात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क असल्याशिवाय प्रवेश देऊ नये अशा सूचना मंदिर प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

 

Advertisement

Advertisement