Advertisement

स्वाराती रुग्णालयाच्या शौचालयात स्त्री जातीचे मृत अर्भक टाकणारी माता पोलीसाच्या ताब्यात!

प्रजापत्र | Sunday, 11/12/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई (प्रतिनिधी) - येथील स्वामी रामानंद तीर्थ  रुग्णालयात अपघात विभागाच्या शौचालयात बकेट मध्ये एक दिवसाचे स्त्री जातीचे मृत अर्भक टाकणाऱ्या  कुमारी मातेला व दोन महिलांना पोलीसांनी चौकशी ताब्यात घेतले आहे.

 

स्वाराती रुग्णालयाचा अपघात विभागाच्या शौचालयात दिनांक २  रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान येथील सफाई कर्मचारी मोहन राठोड साफसफाई करत असताना लाल रंगाच्या बकेटमध्ये पाण्यात बुडालेले स्त्री जातीचे मर्त अर्भक दिसून आले. याची माहिती वरिष्ठांना  सांगितल्यानंतर अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन येथे सदरील मृत अर्भक कोणी टाकले याबाबत मोहन राठोड यांनी फिर्याद दिली.त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 

 या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार भागवत कांदे व त्यांचे सहकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल मंगेश भोले यांनी अपघात विभागातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता तीन महिला संशयित वावरताना दिसल्या त्यामुळे अपघात विभागांमध्ये आलेल्या सर्व रेकॉर्ड  तपासले असता त्यांना पिंपरी नाव असलेले छोटी चिठ्ठी  आढळल्यामुळे त्यांनी अंबाजोगाई तालुका परळी तालुका केज तालुका धारूर तालुका या गावांमध्ये पिंपरी किंवा पिंपरीला जोड नाव असणारे गावांचा शोध घेण्यास सुरुवात केली या शोधामध्ये त्यांना  जिल्ह्यातील एका पिंपरी नावा अगोदर इतर नाव असलेल्या गावी पोचले असता सीसीटीव्ही मधील फुटेज मध्ये दिसणारे चेहरे सारखे चेहरे आढळून आल्यामुळे त्यांनी धारूर येथील महिला पोलीस बोलवत सदरील सज्ञाणपण कुमारी असलेल्या मुलीस विचारपूस केली असता दिनांक दोन रोजीच्या रात्री त्या रुग्णालयात आल्याचे कबूल केले.

 

 

 19 वर्षे मुलीचे पोट दुखू लागल्यामुळे गावाहून मुलीची आई व शेजारील महिलेस सोबत घेत स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय येथे रात्रीच्या वेळी अपघात विभागामध्ये डॉक्टरांना दाखवले डॉक्टरांनी सदरील मुलीस इंजेक्शन औषध उपचार केला मात्र याचवेळी सदरील मुलीने अपघात विभागाच्या बाजूला असलेल्या शौचालयात बाथरूमला जाते म्हणून गेली व बराच वेळ बाथरूम मध्ये राहिली सदरील मुलीस असाहाय्य वेदना होत असताना शौचालयातच ती बाळंत झाली यावेळी स्त्री जातीचे जन्मलेले अर्भक मृत होते की जिवंत हे पोलीस चौकशीत समोर येणार आहे हे जन्मलेले अर्भक तिने शौचालयातील लाल रंगाच्या मोठ्या बकेटमध्ये पाण्यात बुडवून टाकले व ते सकाळी सफाई कर्मचारी यांना राठोड यांना दिसल्यामुळे गर्दीचा असलेला अपघात विभाग त्यात सापडलेली मृत स्त्री जातीचे अर्भक यामुळे रुग्णालय प्रशासनात एकच खळबळ उडाली त्यामुळे पोलिसात राठोड यांनी तक्रार दिली होती.
 

Advertisement

Advertisement