Advertisement

रेल्वेच्या खिडकीची काच फोडून आत घुसला लोखंडी रॉड

प्रजापत्र | Friday, 02/12/2022
बातमी शेअर करा

 रेल्वे दुर्घटनेची (Railway Accident) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वेच्या खिडकीची काच फोडून लोखंडी रॉड (Iron rod) प्रवाशाच्या मानेतून थेट आरपार गेला. यात प्रवाशाचा (Passenger) जागीच मृत्यू झाला. अलीगडच्या (Aligarh) सोमाना रेल्वे स्टेशनवर (Somana Railway Station) ही धक्कादायक घटना घडली आहे. मृत प्रवाशी हा सुल्तानपूर (Sultanpur) इथे रहाणारा असल्याची माहिती आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

 

 

काय आहे नेमकी घटना?
अलीगडमधल्या सोमाना रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 वर नीलांचल एक्स्प्रेस (Nilanchal Express) सकाळी 9.30 वाजता दाखल झाली. एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात एक व्यक्ती खिडकीच्या जवळ बसला होता. एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मवर (Railway Platform) येत असतानाच बाहेर आलेला एक लोखंडी रॉड खिडकीची काच फोडून थेट प्रवाशाच्या मानेत घुसला. यात प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. मृत प्रवाशाचा नाव हरिकेश दुबे असं असून तो सुलतानपूर इथला रहिवासी आहे. 

 

 
रेल्वे पोलीस घटनास्थळी
दुर्घटनेची माहिती मिळताच आरपीएएफ (RPF) आणि सीआरपीएफ (CRPF) पोलिसांसह रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. ही दुर्घटना नेमकी कशी घडली, याला कोण जबाबदार आहे याची माहिती रेल्वे पोलिसांकडून घेतली जात आहे. दरम्यान प्रवाशाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
नीलांचल एक्स्प्रेसमधील प्रशाच्या मानेत लोखंडी रॉड घुसल्याची माहिती सकाळी मिळाल्याचं आरपीएफ सीओ केपी सिंह यांनी सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमानी रेल्वे स्थानकात नव्या रेल्वे ट्रॅकचं काम सुरु आहे. या कामादरम्यान बाहेरुन एखादा लोखंडी रॉड आला का याचा पोलीस तपास करत आहेत. मृत प्रवाशाच्या कुटुंबियांना याबाबत माहिती देण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

 

Advertisement

Advertisement