Advertisement

ऐन बैठकीत कोब्रा सापाच्या 'एन्ट्री'ने आरोग्य कर्मचाऱ्यांची उडाली धांदल

प्रजापत्र | Tuesday, 01/11/2022
बातमी शेअर करा

आष्टी दि.१ (प्रतिनिधी) - धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी कर्मचाऱ्यांची मासिक बैठक सुरू असतानाच अचानक भलमोठा कोब्रा साप निघाल्याने एकच खळबळ उडाली. पाऊण तास ठाण मांडलेल्या सापाला अखेर सर्पमित्र अर्जुन चौधरी यांनी पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले.

 

 

आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणारी उपकेंद्रातील कर्मचारी यांची मासिक बैठकिचे आयोजन सोमवारी दुपारी करण्यात आले होते. बैठकीचे कामकाज सुरू असताना अचानक प्राथमिक आरोग्य केंद्रातील बैठक सुरू असलेल्या हाॅलमध्ये भलामोठा साप निघाला. सापाला पाहताच कर्मचाऱ्यांची मोठी धांदल उडाली. त्यानंतर तब्बल पाऊण तास हा कोब्रा साप तेथेच होता.

 

Advertisement

Advertisement