Advertisement

हाजीपूरमध्ये पुन्हा 2 शेळ्यांचा पाडला लांडग्यांनी फडशा

प्रजापत्र | Tuesday, 01/11/2022
बातमी शेअर करा

आष्टी दि.१ (प्रतिनिधी) - तालुक्यातील हाजीपूरमध्ये लांडग्यांनी चांगलाच हौदोस घातला असून मागिल काही दिवसांपूर्वी च 10 शेळ्यांचा फडशा लांडग्यांच्या हल्लात पडला होता.ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा दि.1 नोव्हेंबर च्या पहाटे हाजीपूर येथील शेतकरी अंकुश राख यांच्या 2 शेळ्यांचा फडशा लांडग्यांच्या हल्लात पडला आहे.हि माहिती समजताच घटनास्थळी तीन तालुक्याचे उपआयुक्त डॉ.संदीप गायकवाड,वनविभागाचे वनरक्षक काळे,महेश मोरे, गौतम टेकाळे, भाळवणी पशुवैद्यकीय दवाखान्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुनिल गदादे यांनी शवविच्छेदन करून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. वारंवार लांडग्यांच्या हल्लात शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होत आहे. वन्य प्राण्यांच्या या वाढत्या वावरामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, वन विभागाने या प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी मा.सरपंच विठ्ठल राख यांच्या सह ग्रामस्थांनी केली आहे.

 

आष्टी तालुक्यातील हाजीपूर येथील शेतकरी अंकुश खोटे यांच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर दि.1 नोव्हेंबर च्या मध्यरात्री 2 ते 3 च्या सुमारास लांडग्यांनी हल्ला करुन 2 शेळ्यांचा फडशा पाडला आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, यांनी ठसे ट्रेस केले असता लांडगा असल्याचे निष्पन्न झाले, घटनास्थळी 1 मृत शेळी आढळून आली असून 1 शेळीचा शोध सुरू आहे. डॉ.सुनिल गदादे यांनी शवविच्छेदन केले असून उद्या अहवालानंतर नेमका लांडगाच होता का हे स्पष्ट होईल लांडग्याने शेळ्या फस्त केल्याने शेतकरी राख यांचे जवळपास 20 हजारपेक्षा जास्तीचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात लांडगे, रानडुकर तसेच हिंस्त्र प्राणी हे पाण्यासह अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असल्याचे सांगण्यात आले.वन्य प्राण्यांच्या या वाढत्या वावरामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
 

Advertisement

Advertisement