Advertisement

४ लाखांच्या मुद्देमालासह चोरटे जेरबंद

प्रजापत्र | Thursday, 20/10/2022
बातमी शेअर करा

गेवराई (प्रतिनिधी) - शहरात राहणाऱ्या एकाच्या राहत्या घरातून दोन वेगवेळे मोबाईल चोरी गेले असल्याची घटना गत महिन्यापुर्वी शहरातील सरस्वती कॉलनी येथे घडली होती. याबाबत सुनिल शिवाजी पंडित यांनी गेवराई पोलिसांत तक्रार नोंदवत सदर तक्रारीत आज्ञात चोरट्यांनी मोबाईल चोरले असल्याचा उल्लेख केला होता, याबाबत गेल्या आठ दिवसापासून सतत सीसीटीव्ही देखरेखीखाली याचा शोध सुरू होता. मात्र काल बुधवार रोजी डीबी पथक गस्त करत असताना एकजणांवर संशय आल्याने त्याला ताब्यात घेत चौकशी करून खाक्या दाखवताच त्याने कबुली दिली. या कारवाईत त्याच्याकडून चार दुचाकी व 12 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल हस्तगत करत एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

 

 आसाराम उर्फ रामा उद्धव बोंगाणे ( वय 19 वर्ष ) रा. भगवान नगर गेवराई असे या आरोपीचे नाव असुन काल बुधवार दि.19 रोजी गेवराई शहरात आठवडी बाजारात फिरत असतांना त्यांच्या संशयीत हालचाली वरूण गस्त घालत असतांना डीबी पथकाने त्याला ताब्यात घेतले व खाक्या दाखवत चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. याबाबत डीबी पथक प्रमुख सपोनि प्रफुल्ल साबळे हे गेल्या आठ दिवसापासून सीसीटीव्हीच्या माध्यमातून सतत चाचपणी करत होते. त्यामुळेच या चोरट्याला जेरबंद करण्यात त्यांना यश आले आल्याचे त्यांनी सांगितले. या कारवाईत या चोरट्याकडून चार दुचाकी मोटारसायकल व वेगवेगळ्या कंपनीचे 12 एनरॉईड मोबाईलसह एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कामगिरी उप अधीक्षक स्वप्नील राठोड, पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार, यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख सहा पोलिस निरीक्षक प्रफूल्ल साबळे, पो.हे.कॉ.जायभाये, पो.ना. नितीन राठोड, पो.ना. संजय राठोड, पो. ना. विठ्ठल राठोड यांनी केली आहे.
 

Advertisement

Advertisement